पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावं...


पुन्हा एकदा तुझ्या..
प्रेमात पडावं...
समोर तू दिसताच...
स्वत:ला सावरावं...

पुन्हा एकदा तुझी....
नव्याने भेट घ्यावी...
निघता निघता मग...
नव्या भेटीची वचने द्यावी...

जगत राहावं मग...
नव्या भेटीच्या आशेने...
जगावे दिवस मग...
पुन्हा एकदा नव्याने...

भेटीचा तो दिवस...
नव्याने उजाडावा...
एक एक क्षण...
डोई जड जावा...

आज ही तू...
तशीच दिसशील...
माझ्या प्रत्येक शब्दावर...
खदखदून हसशील...

भेटीगाठींचा ओघ मग...
हळूहळू वाढत जावे...
हृद्याच्या पाकळीवर...
तुझे नाव उमटावे...

एक खास दिवस निवडून...
मनातले सारं सांगवं...
अन तू रोज सारखचं...
हसून टाळावं....

हेच सारं सये..
जगणं पुन्हा जगावं...
वाटतेय पुन्हा एकदा..
तुझ्या प्रेमात पडावं...
©*मंथन*™.. २९/०४/२०१५

Post a Comment

Previous Post Next Post