आपली ही मैत्री..अशीच काहीशी असावी..

मला पाहताच..तू खुदकन हसावी..

आपली ही मैत्री..अशीच काहीशी असावी..

तू म्हणशील हो त्याला..माझीही नकार नसावी,
आपली ही मैत्री..अशीच काहीशी असावी..

मी पावसात भिजत असताना.. तू ही चिंब भिजावी..
आपली ही मैत्री..अशीच काहीशी असावी..

मी हाक देताच.. तू समोर दिसावी..
आपली ही मैत्री..अशीच काहीशी असावी..
©*मंथन*™.. ०४/०८/२०१३

Post a Comment

Previous Post Next Post