आपली पहीली भेट...


तुला आठवते ती..
आपली पहीली भेट...
तू गुपचूप माझ्या मागून येऊन..
मला घाबरवले होतेस..
मी क्षणभर दचकलोच..
कधीची ही ओळख गं...
तुझी अन माझी..
जी इथंवर आपल्याला..
घेऊन आली आज...
बस्सं मी तुझ्या..
प्रत्येक हालचाली हेरत होतो..
आता ही काय करेल...
पुढच्या क्षणाला..
अग्गं आज पहिलीच भेट आहे..
पुन्हा येईन ना घरी...
अरे अस्स काय करतोस...
आई तुझ्यासाठी बनवलेय पुरी..
तू ना ऐकनारच नाहीस...
किती हट्टी आहे तू..
जर घरी येणार नाहिस..
तर जा कट्टी फ़ू...
मी तुला नकार देणार नाही..
हे तुला माहीतच होते...
आपल्या पहिल्या भेटीचे..
एक गुपितच होते...
©*मंथन*™.. २६/०२/२०१३

Post a Comment

Previous Post Next Post