*-नसेन मी तेव्हा-*


आज तुझ्या साठी..
शब्द शब्द मोहरलेला..
तुला कळेल माझा शब्द..
कदाचीत नसेन मी तेव्हा..

तुझ्या साठी विणलेली..
मी ही शब्दांची चादर..
तू तिला पांघरताना..
कदाचीत नसेन मी तेव्हा..

शब्दात ओतला प्राण..
कळावे तुला माझं प्रेम..
तुला सारं कळेल जेव्हा..
कदाचीत नसेन मी तेव्हा..

आठवणींच्या उंबरठ्यावर..
मी डोके लावून बसलेलो..
तू तिथे येशील जेव्हा..
कदाचीत नसेन मी तेव्हा..

पारावरच्या कट्ट्यावर...
तुझी वाट पाहताना..
तू वाट पाहशील जेव्हा..
कदाचीत नसेन मी तेव्हा..

तू आवाज देशील मला..
हृदयाच्या आकांतातून...
तुला साद देण्यास ...
नसेन मी तेव्हा..
©*मंथन*™.. १५/१०/२०१२

Post a Comment

Previous Post Next Post