*माझं गावं*

सह्याद्रिच्या कडे कपारीत..

माझं इवलसं गावं..
चिर्‍या मातीच्या घरात..
नांदतात रंक अन राव...

रानपाखरे गाती सारी..
मंजूळ अशी गाणी...
सुरात सुर मिसळून वाहे..
खळखळणारं पाणी..

उंच उंच हे साद घालती..
सह्याद्रिचे कडे..
गळयात गळा घालून वाहती..
नितळ असे झरे..

कडे सारे नेसुन येती..
हिरवा भरझरी शालू..
आला पाऊस आला पाऊस..
सांगे पावशाळू...

एकामागून एक शर्यती साठी..
सारे कडे सज्ज..
मंदीराच्या मनोर्‍यावर..
शोभे भगवा ध्वज..

शेते सारी बहरलेली..
नव्या नवलाई ने..
तालावर नाचतात ती..
कधी झोका दिला वार्‍याने..
©*मंथन*™.. २७/०९/२०१२

फेसबूक वरील माझ्या गावाचे फोटो पाहण्यासाठी येथे टीचकी मारा 

G+ वरील माझ्या गावाचे फोटो पाहण्यासाठी येथे टीचकी मारा 

2 Comments

Previous Post Next Post