एक अनोळखी कधी कधी..



एक अनोळखी कधी कधी..
अचानक ओळखीची वाटते..
तिच्या स्वप्नांचे घरटे...
रात्र रात्र मनात दाटते...

भेटावे तीला पुन्हा..
असे वारंवार वाटते..
दुरुन तिला पाहीले तरी..
मनोमनी भरुन येते..

एकदा तिला भेटून..
सांगावे तिला सारे...
सतत तुझ्या प्रितीचे..
वाहतात गार गार वारे...

मी तुला पाहिल्या पासुन...
सर्व गेलोय विसरुन...
तुझ्या शिवाय जिवन माझे..
सारेच गेलेय विखरुन...

तु ये माझ्या जिवनात..
पुन्हा आनंद भरायला...
माझ्या डोळ्यांमधली..
गोड गोड स्वप्ने चोरायला...
©*मंथन*™.. १०/०३/२०१२

Post a Comment

Previous Post Next Post