भेट ती आपली..

भेट ती आपली..
आठवते पुन्हा पुन्हा .....
लोक पाहत होते ...
जसा केला होता काही गुन्हा...

तुझ्या मनात काही..
विचारांचा खेळ होता....
माझ्या साठी मात्र...
तो दोन जिवांचा मेल होता...

भेटीसाठी आतुरलेली...
दोन मने भेटायची...
निरोपाच्या वेळी...
डोळ्यात आसवे दाटायची...

पुढच्या भेटीचे..
देऊन एकमेका वचन...
करत होते ते दोघे...
आपल्या भेटीचे निरोप संघोपन...

तुझ्या माझ्या हृदयात ....
प्रेमाचे बिज लागले होते पेरू...
त्या आधीच नशीबाने ..
केला खेळ सुरू...

नशिबाच्या खेळाला..
दोघेही गेलो सामोरे...
तरी आपले प्रेम..
तसेच राहीले अधुरे..
©*मंथन*™.. ०६/११/२०११ रात्रौ १.१४

Post a Comment

Previous Post Next Post