हा अबोला,
हे दुरावे...का असे?
जवळ तू अन्,
मी झुरावे...का असे?
जेवढे जवळ यावे,
तेवढीच दूर जातेस..का असे?,
बोटाने हिसका देत मग,
नाक मुरडत जातेस...का असे?
सुचत नाही तुझ्या शिवाय,
मन विचलित होते...का असे?
तू दिसताच खुलतो माझ्या,
हृदयाचा दरवाजा.. का असे?
लपत छपत मग पाहून मला,
तुझे गोड हसणे... का असे?
चेहऱ्या मागे लपविलेले,
भाव तुझे घायाळ करती...का असे?
रोजचाच झाला हा,
तुझा छळवाद ....का.. असे?
तुझी याद टाळतो,
मी आता तुला आठवून..का .. असे?
पाहिजे वाटते आता,
शांतता मनाला... का असे?
तुला पाहून हरपते,
भान माझे.. का असे?
बोलावे वाटते तुझ्याशी...
पण शब्दच येत नाही .. का असे?
प्रेमाचे दोन शब्द,
वाटावे पण..... का असे?
वाटते, प्रेमाचे दोन शब्द,
तुझ्याशी बोलावे..का असे?
पण शब्दांची सांगड,
घालताच येत नाहीत...का असे ???..
अबोल माझ्या डोळ्यात,
स्वप्न तुझे दिसते...का असे?
कधीच कोणी बोलकं केलं नाही...
मन तुझ्या साठी झुरते..का असे?
हे दुरावे...का असे?
जवळ तू अन्,
मी झुरावे...का असे?
जेवढे जवळ यावे,
तेवढीच दूर जातेस..का असे?,
बोटाने हिसका देत मग,
नाक मुरडत जातेस...का असे?
सुचत नाही तुझ्या शिवाय,
मन विचलित होते...का असे?
तू दिसताच खुलतो माझ्या,
हृदयाचा दरवाजा.. का असे?
लपत छपत मग पाहून मला,
तुझे गोड हसणे... का असे?
चेहऱ्या मागे लपविलेले,
भाव तुझे घायाळ करती...का असे?
रोजचाच झाला हा,
तुझा छळवाद ....का.. असे?
तुझी याद टाळतो,
मी आता तुला आठवून..का .. असे?
पाहिजे वाटते आता,
शांतता मनाला... का असे?
तुला पाहून हरपते,
भान माझे.. का असे?
बोलावे वाटते तुझ्याशी...
पण शब्दच येत नाही .. का असे?
प्रेमाचे दोन शब्द,
वाटावे पण..... का असे?
वाटते, प्रेमाचे दोन शब्द,
तुझ्याशी बोलावे..का असे?
पण शब्दांची सांगड,
घालताच येत नाहीत...का असे ???..
अबोल माझ्या डोळ्यात,
स्वप्न तुझे दिसते...का असे?
कधीच कोणी बोलकं केलं नाही...
मन तुझ्या साठी झुरते..का असे?
भोळ्या माझ्या भावनांना
जागवते तुझी अदा...का असे?
तुझ्या कोमल स्पर्शाला,
खुणावते तुझी नशा..का असे?
कधीच कोणी समजलं नाही...
जागवते तुझी अदा...का असे?
तुझ्या कोमल स्पर्शाला,
खुणावते तुझी नशा..का असे?
कधीच कोणी समजलं नाही...
का असे?
*मंथन*
Tags:
माझ्या कविता