प्रेमाच गाव.


तुझ्या सोबत चालताना,
एक छानस प्रेमाच गाव दिसल,
आपल मन पण मग,
तिथेच जाऊन फ़सल..

प्रेमाच्या गावात होते,
दोघे राजा राणी,
राजा होता प्रेमळ आणि,
खुप नाजुक होती राणी..

प्रेमाच्या गावात गेले,
आपले मन रमून,
दोघानचीहि मने मग..
तेथेच आली जूळून..

प्रेमाच्या गावा मध्ये,
नव्ह्ता प्रेमाला तोटा,
फ़क्त प्रेम प्रेम प्रेम..
असा थाट मोठा..

प्रेमाच्या गावा मध्ये,
विरह पाणी भरे,
त्याच्या तो थाट पाहून,
दु:ख हि कूरकूरे..

प्रेमाच्या गावाची..
अशी हि कहानी.
मी होतो राजा,
आणि तु माझी राणी..

अश्या या सुन्दर गावाला,
तुम्हीही भेट देऊन या,
कधी तरी तुम्ही पण,
प्रेम करून पहा....

*मन्थन*

Post a Comment

Previous Post Next Post