प्रेम... म्हणजे


प्रेम... म्हणजे
एक छान संवेदना....
त्यात तुझ्या नि माझ्या,
गुंतल्या भावना॥
प्रेम... वाळक्या लाकडाला,फुटलेली नवी पालवी॥
माझी प्रत्येक रात्र,
तुझ्या आठवणीत जावी...

प्रेम... निर्जल झऱ्याला,
आलेली पाणवल॥
तुझ्या माझी प्रेमाचे,
फुललेले प्रेम फुल॥

प्रेम... ओसाड जमिनीवर,
आलेली एक हिरवळ ...
तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच,
फुलत राहो कातरवेळ..

♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

Post a Comment

Previous Post Next Post