एकदा येऊन जा

एकदा येऊन जा तू, एकदा येऊन जा,
पुन्हा येऊन मला.. तसाच हसवून जा,

मी जसा होतो आधी तसा बनवून जा,
हसता हसता मध्येच... थोडासा रडवून जा,

'एकही नाते मला सांभाळता आले कुठे?'
तू तरी हा डाग माझ्यानावचा मिटवून जा,

तू केलेल्या प्रेमाला, पुन्हा एकदा जागवून जा,
प्रत्यक्षात नाही तरी, स्वप्नात तरी येऊन जा,


हे तुलाही मान्य आहे एवढे कळवून जा,
मी केलेली ती चूक मलाच कळवून जा,

एकदा मी संपण्याआधी मला भेटून जा,
शेवटच्या घडीला तरी... हाथात हाथ देऊन जा...

शेवटची हि हाक तुला पुन्हा एकदा येऊन जा ...
♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

Post a Comment

Previous Post Next Post