🟠 महाराष्ट्राला नमन 🟠
✍️ मंथन मर्म माझ्या मनाचे
संत महात्मा जिथे जन्मले
ओवी गाथा जिथे रचिले
शिवबा माझे जिथे दौडले
स्वराज्य तोरण जिथे बांधले
शंभू राजे जिथे बरसले
त्या औरंग्या जिथे गाडले
दिल्ली तख्त जिथे नमले
भगवे रक्त जिथे वाहिले
त्या महाराष्ट्रा नमन करतो
शब्द अपुरे तरी "मंथन" लिहितो.
Tags
माझ्या कविता
khup chaan....Jay Maharashtra
ReplyDeleteधन्यवाद
Delete