मी रोप इवलेसे
एक दिवस झाड होईन
घाल पानी बाळा रोज
तुलाच सावली देईन
फळे फुले आणि
बरेच काही
तुझ्यासाठी मी
साठवले आहे
फांद्यांवरुन माझ्या तू
मारशील जेव्हा उडी
संभाळून हा जरा
धकधक होते उरी
फांदीवर बांधून झोका
उंच उंच उडशील
आकाश ठेंगणे होऊन
त्याला मिठी मारशील
चवीने खाशील तू
माझे मधुर फळ
तेव्हा होईल रे
माझा जन्म सफळ
#मंथन