आस्तिकतेचा कळस...


आस्तिकतेचा कळस...

परवा एका मित्राने whatsapp वर एक संदेश पाठवला, म्हणे आरती बोलण्यात होणार्‍या चुका. पण ज्याने कुणी त्या चुका शोधल्या त्याने तो संदेश संपवताना त्याच्यावर विनोद करायचा हक्क जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे पार पाडला. अन आपले मित्र मंडळी तो संदेश अश्या प्रकारे इकडे तिकडे पसरवत आहेत जसे काही यांच्यावर त्या चुका सुधारण्याचा बोजा येऊन पडलाय. अन यांनी तो संदेश कुणाला पाठवला नाही तर त्याचुका सुधारणे अशक्य होईल. माझा या प्रकाराला आधीपासूनच विरोध आहे अन पुढे ही असेल. मी त्याला जाब विचारला असता त्याने उत्तर दिले की या पुढे चुका होऊ नयेत म्हणून हा संदेश त्याने पाठविला. जर असे संदेश पाठवून चुका सुधारल्या असत्या तर भारताने पाकिस्तान ला असे संदेश पाठवुन आपले म्हणने नक्कीच पटवुन दिले असते असो हा एक विनोदाचा भाग होता. माझा आक्षेप त्या संदेशाला नाही पण त्यातिल जो विनोदाचा भाग आहे त्याला होता अन आहे. मी त्याला म्हटले ही की  विनोदाचा भाग काढुन का नाही पाठवलेस तर त्यावर बराच वाद झाला. इतर ही काही जन त्याची बाजून घेऊ लागले. मी म्हटेल की या चुका आताच होतात असे नाही अन त्या आताच कसे लक्षात आले यांच्या तर म्हणे आता त्या चुका दाखवण्यासाठी whatsapp सारखा मंच भेटला आहे. जर यांना मंच पाहिजे होता मग या आधीच अनेक असे मंच आहेतच! त्यांचा उपयोग का नाही केला यांनी? आत्ताच का?

जे अशिक्षित कमी शिकलेले आहेत त्यांच्या कडुन अशा चुका होतात, ज्यांनी फ़क्त एकुन त्या आरत्या पाठ केल्या आहेत ते लोक काही शब्द चुकतात मान्य आहे मला पण, या लोकांना समजवण्यासाठी असे संदेश पाठवने की महत्वाचे आहे? अन असे विनोद पसरवुन लोक फ़क्त त्यातल्या विनोदाची मजा घेतात. अन हे whatsapp चे संदेश अशिक्षित लोकांना वाचता येतात?

मला वाटत हा फ़क्त एक मन रमवुन घेण्याचा डाव आहे. नक्कीच प्रत्येकाचा तो अधिकार आहे पण आपण आपले मन रमवुन घेण्यासाठी कशाचा उपयोग करतोय हे लक्षात घ्या. फ़क्त उचलली जीभ आणि लावली टाल्याला असे नको, स्वत:ला कीती पटते ते पहा अन पुढील पाऊल उचला. देवी देवतांच्या आरत्या, संत मंडळी यांच्यावर विनोद करुन आपण काय साध्य करतो? विनोद करुन चुका दाखवणे कितपत योग्य, खुला मंच मिळाला म्हणून काहीही खपवुन घ्यायचे. का तर हे श्रद्धावंत पोथीपुराणातल्या चुका काडून आस्तिकतेचा कळस गाठणारे.

माझ्या या मतावरुन तुम्ही नक्कीच मी आस्तिक की नास्तिक? आता तुम्ही माझ्या या प्रश्नावर बोट वर कराल मला आशा आहे. यावर व पू काळे यांचे एक वाक्य आठवतेय..

मी आस्तिक आहे की नास्तिक याचा शोध मी कधी घेतलेला नाही. मी श्रद्धावंत मात्र जरुर आहे. सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचे नाही..
*व पू काळे

अजून बोलण्यासारखे खुप काही आहे तुर्तास एवढेच. मी माझे वैयत्तीक मत मांडले, तुम्हाला आवडले असेल नसेल हे तुमचे सर्वस्वी मत राहील.

धन्यवाद
प्रशांत पवार...

Post a Comment

Previous Post Next Post