©*मंथन*™...

  • शब्द तुझ्या साठी लिहिलेले…
  • शब्द तुझ्या हसण्यावर लिहीलेले…
  • शब्द तुझ्या रुसण्यावर रचलेले…
  • शब्द तुझ्या हृद्यात गुंतलेले…
  • शब्द तुझ्या मनात मिसळलेले…
  • येथे माझं काहीच नाही… मी अन माझे शब्द…
  • फक्त तुझ्यासाठीचं जन्मलेले…

आता तरी तू माझी होशील का..?

कधी पासुन पाहतोय तुझी वाट..
तु पुन्हा येऊन जाशील का...?
मी तुझ्या साठी थांबलो आहे...
तिथेच तू माझी वाट पाहशील का...?

चंद्रा सोबत चांदणी आहे..
वारयासोबत रागिणी आहे..
तु पण माझ्यासाठी झुरशील का..?
आता तरी तू माझी होशील का..?

बंद या मनात तू पुन्हा...
येऊन राहशील का..?
उघडले पुन्हा हृदयाचे दार..
आता तरी तू माझी होशील का..?
©*मंथन*™.. १३/०२/२०१२
Share on Google Plus

About प्रशांत पवार

Google+ Followers

यांना नक्की भेट द्या

Followers