माझी परी राणी- Manthan


चिमुकल्या पावलांनी
सजेल माझे अंगण
छुनछुन घरभर
वाजतील तिचे पैंजण

इवलेशे हात
मीचमीच डोळे
पोटी लागता भूक
क्या क्या रडे

हाती घेताच तिला
आकाश ठेंगणे झाले
जगातले सर्वात मोठे
वाटले सुख मिळाले

बोलेल ती पण
तिचे बोबडे बोल
धावता धावता मग
जाईल ही तोल

पडत झडत, रडत रडत
भातुकली मांडून
माझाच बाबा चांगला
सांगेल सर्वांना भांडून

अलगद तिचे स्पर्श,
नवी उमेद आली,
चिमुकली नाजुकशी
माझी परी राणी
#मंथन

Comments